मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे.
पंढरपूर प्रतिनिधी
तालुक्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची घरोघरी जाऊन मतदार नोंदणीची मोहीम सुरू आहे. ही मोहीम पुढील चार दिवस सुरु राहणार आहे.मतदारांनी मतदान नोंदणी अधिकारी यांना मतदार यादीतील आपल्या नावांची तपासणी करणे, दुबार नावे वगळणे व मतदार यादीची शुद्धी करण्यासाठी सहकार्य करावे.तसेच नव मतदारांची नोंदणी करण्यासह मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले आहे.
सास्कृंतीक भवन, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे राजकीय पक्ष प्रतिनिधी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी निवडणूक नायब तहसिलदार वैभव बुचके, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुंजकर, तहसिल कार्यालयाचे आर आर शिंदे तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.
गाव पातळीवर सर्व संबंधित गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व कोतवाल यांची संयुक्त समिती तयार करण्यात आली असून सदर समितीकडून त्या गावातील सर्व मतदार यादी तपासून घेण्यात येणार आहे. यामध्ये मयत स्थलांतरित, आढळ न झालेले मतदार नव मतदार नोंदणी माहिती घेण्यात येणार आहेत. तसेच सदर तपासणी वेळी गावातील 18 ते 29 वयोगटातील सर्व नागरिकांच्या नावाचा समावेश आहे का नाही याचा शोध घेऊन ज्यांचे नाव मतदार यादीत नाही अशा नागरिकांची नावे बीएलओमार्फत अर्ज क्रमांक 6 भरून घेण्यात यावा अशा सूचना सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिल्या.
मतदार यादी मध्ये नाव समाविष्ट करणे मयत व दुबार मतदारांची नावे वगळणे, स्थानांतर करणे, नावात दुरुस्ती करण्याची संधी पूननिरीक्षण कार्यक्रमामुळे प्राप्त झाली आहे. प्रशासनामार्फत याविषयी व्यापक जनजागृती केली जात आहे. राजकीय पक्षांनी सुद्धा मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक करून तसेच आपल्या स्तरावरून पूननिरीक्षण कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून सहकार्य करावे. असे आवाहनही सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार बेल्हेकर यांनी केले आहे.

