पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्राचे सुप्रसिध्द रांगोळीकार तथा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विजेते, खेड तालुक्यातील कळमोडी गावचे सुपुत्र प्रसिद्ध रांगोळीकार चित्रकार महादेव गोपाळे यांचे आपल्या मातोश्री स्व.लक्ष्मीबाई शंकर गोपाळे. यांच्या प्रथम स्मृतीदिना निमित्त पुणे येथील बालगंधर्व कलादालनात त्यांच्या आजवरील जीवनातील रेखाटलेल्या कलाकृतीचे कला प्रदर्शन सुरू आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन जागतिक कीर्तीचे शिल्पकार ज्यांनी वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरचे शिल्प बनवले ते मा.श्री.प्रमोद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले...!!
हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य दि. 20 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2023 पर्यंत सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहणार आहे.
या निमित्ताने श्री.महादेव गोपाळे यांच्या पाठी आशीर्वाद असणाऱ्या माऊलीची आठवण म्हणून सरांच्या मातोश्री स्व.सौ.लक्ष्मीबाई शंकर गोपाळे.यांचे प्रथम स्मृतिदिना निमित्त चांदवड.भाटगाव हायस्कुल चे कलाशिक्षक श्री.देव हिरे यांनी फळ्यावर रंगीत खडू माध्यमातील पोर्ट्रेट साकारून श्री.महादेव गोपाळे सरांना अनोखी मातृभेट दिली आहे.
दि.२३ डिसेंबर २०२३ रोजी अनेक जिल्ह्यातून सर्व कलावंत या प्रदर्शनास भेट देणार आहेत,आम्ही येतोय आपणही नक्की या,,,,!
- फलक रेखाटन आर्टिस्ट- देव हिरे.