सोलापूर प्रतिनिधी शिवाजी कांबळे
सोलापूर मध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख घटक पक्षातील शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय काँग्रेस या तीन पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याची संयुक्त बैठक शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली, RTO कार्यालया जवळील सुभद्रा बाई जाधव सभागृह अर्थात राष्ट्रवादीचे नेते भारत जाधव यांच्या निवासस्थानी रविवार दिनांक १० डिसेंबर 2023 रोजी संपन्न झाली .या बैठकीस शिवसेना संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड उत्तमप्रकाश खंदारे, पुरुषोत्तम बर्डे, अजय दासरी ,अमर पाटील संभाजी शिंदे, लक्ष्मण हाके,
सीमा पाटील ,पुनम अभंगराव, आशा टोणपे, राष्ट्रवादीचे भारत जाधव, प्रमोद गायकवाड, अशोक निबर्गी ,मनोहर सपाटे, जनार्दन कारमपूरी,महेश कोठे, सुधीर खरटमल, तौफिक शेख ,काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, बाबा मिस्त्री,यु.एन. बेरिया, सुनिता रोटे व महिला पदाधिकारी उपस्थित होते, सर्वच पक्षांच्या पदाधिकारी यांनी सोलापूर येथील स्थानिक व ग्रामीण भागातील प्रश्न , राजकीय स्थिती, यावर मत प्रदर्शित केले .
शेवटी मार्गदर्शन करताना खा.संजय राऊत. यांनी विद्यमान बिघाडी सरकार चा खरपोस समाचार घेतला, हे सरकार अंतिम घटका मोजत आहे, या सरकारचे विसर्जन करून जनहिताचे सरकार माविआ च्या माध्यमातून आणण्यासाठी एकदिलाने कामाला लागा ...भाजपाने नवे पंचांग मांडले आहे, भारतीय संस्कृती मध्ये पाडवा ,दसरा या पवित्र सणाला गुढी उभारली जाते पन हे भाजपा वाले सोयीचे राजकारण करत आहेत,राम मंदिर हे सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान आहे ते केवळ भाजपची जहांगीर नाही, रामाची मालिका करून ते रामाचे अवमूल्यन करीत आहेत ..धर्माचा वापर राजकारणासाठी करीत आहेत,गुढी उभारण्याचा आदेश भारतीय जनता पक्षाने देऊ नये ..आम्ही येणारा पाडवा व दसरा यावेळी गुडी उभारू असा इशारा दिला.तसेच सोलापूरा तून माविआ च्या या महत्वाच्या बैठकीपासून सुरू झालेला हा सोलापूर पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असले चे त्यानी सांगितले.
या बैठकीमुळे माविआ ची एकजुट दिसुन आली . पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात कमालीचा उत्साह संचारला तज्ञ होता.आता माविआ ची जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करून कृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.