पंढरपूर प्रतिनिधी
श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने देण्यात येणारा आदर्श कामगार पुरस्कार शेळवे येथील उत्तम शामराव गाजरे यांना प्रदान करण्यात आला.
श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि.वेणूनगर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.आ.औदुंबर अण्णा पाटील यांच्या १०० व्या जयंतीचे औचित्य साधून श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष चेअरमन अभिजित पाटील यांच्या कल्पनेतून विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून दरवर्षी कर्मवीर अण्णांच्या जयंतीदिनी पाच कामगारांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार देण्याचे ठरविण्यात आले त्यातील पहिल्याच वर्षी शेळवे येथील पॅनमन उत्तम शामराव गाजरे यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना या वर्षीचा आदर्श कामगार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले,उत्तम शामराव गाजरे हे सन १९८१ रोजी विठ्ठल कारखान्यात रुजू झाले व आज ४२ वर्ष ते अतिशय उत्कृष्टपणे सेवा बजावत आहेत,त्यांची स्वतःच्या कर्तव्याप्रति असलेली निष्ठा,प्रामाणिकपणा पाहून कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या शुभहस्ते त्यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,प्रसंगी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,जेष्ठ सभासद आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित होते..!!