विशेष लेख
नाशिक जिल्हयातला ईगतपुरी तालुका हा आदिवासी बहुल, अतिदुर्गम, मागासलेला व प्रकल्पबाधीत तालुका. मात्र नाशिक शहरासह जिल्हयालाही लाजवेल अशी साहित्य चळवळ या ठिकाणी चालते.याच तालुक्यातुन प्रसिद्द होणारा व मराठी भाषिकाच्यां जगभरातील वास्तव्याच्या ठिकाणी पोहचण्याची कामगिरी करणारा *साहित्य परिषद दिवाळी अंक* यांस यंदा एक तप म्हंणजे बारा वर्ष पुर्ण झाली असुन या अविश्रांत चळवळीचे संपुर्ण श्रेय संपादक नवनाथ अर्जुन पा. गायकर या ध्येय्यवेडया साहित्यीकास जाते.
कुठलेही शासकिय आर्थिक पाठबळ नसतानां केवळ स्वपुण्याई, सामाजीक संपर्काच्या माध्यमातुन गायकरानीं साहित्य परिषद चळवळ जोमाने चालवली आहे हे अभुतपूर्व आहे.
यंदा प्रसिद्द झालेल्या साहित्य परिषदेच्या बाराव्या दिवाळी विशेषांकात भरगच्च असा वाचनीय मजकुर आहे. यंदाचा हा दिवाळी अंक इस्रायल व फिलीस्तानी, रशिया व युक्रेन युद्धासह जगभरात धर्म, जमिनी व विविध वादामध्ये हकनाक मारल्या जाणार्या निरपराध नागरिकानां अर्पण करण्यात आला आहे. हे या अंकाचे वैशिष्टय़ आहे.
संपादकीय मध्ये संपादक नवनाथ गायकर यांनी साहित्य परिषद चा बारा वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेतानांच जिल्हाभरातील ही विविध साहित्यिक व चळवळीचा आढावा घेतला आहे.
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये देशातील राजकिय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे तर महाराष्ट्रातील सावळया गोंधळावरही विश्लेषण करण्यात आले आहे.
अंकात श्रीमती लता पाटिल, शरद पुराणिक, नवनाथ गायकर, श्रीराम तोकडे, रामदास राजेगावकर, मिलिंद चिंधडे, सावळीराम तिदमे, ऋतुजा सावंत, संगिता रघटाटे, प्रविण जोशी, गुरुप्रसाद पणदुरकर, प्रा.अरुण पाटिल, प्रविण लोहार, संजय धनगव्हाळ,पल्लवी पांडे, प्रीती दिक्षीत आदिच्यां कथासह, अध्यात्म, निसर्ग, वडिल, अर्थनीती, सद्गुरु अशा विषयावर वाचनीय मजकुर आहे. सर्जिकल स्ट्राईक, वारसदार, शेरु , अंर्तयात्रा , बाबा असा विविध वाचनीय साहित्य मेवा आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजीत कविता स्पर्धेमधील सहभागी शंभर पेक्षा जास्त कवीच्यां कविताचां या अंकात समावेश आहे.
ज्यात राजु आतकरी, देविदास वारुंगसे, रविंद्र पाटिल, देविदास शिरसाट, संजय कान्हव, नवनाथ गायकर, लता पाटिल, प्रज्ञा घोडके, माणिकराव गोडसे, शरद मालुंजकर, विदया पाटिल, योगेश जोशी, दत्ता देशमुख, बाळासाहेब गिरी, गोरख पालवे, रोहिणी चौधरी, संध्या भगत आदिसह विविध कवीचां काव्य खजिना आहे.
मुखपृष्ठासह अंकाची अंतर्गत सजावट दिपक दंडवते यांनी केली आहे तर छपाई कल्पेश बिरारी यांनी केली आहे.
अंक खुपच देखणा व भरगच्च मजकुर असल्याने वाचनीय असा झाला आहे.
*साहित्य परिषद दिवाळी अंक २०२३*
*संपादक-नवनाथ अर्जुन पा गायकर*
*स्वागतमुल्य- २०० रुपये*
*- लेखन - श्रीराम तोकडे*