भाळवणी प्रतिनिधी
भाळवणी येथे शनिवार दिनांक २ डिसेंबर रोजी परम पूज्य काशिनाथ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथी निमित्ताने शनिवार 2/12/2023 रोजी रात्री 8=00 वाजता श्रीराम मंदिर, शुक्रवार पेठ,भाळवणी येथे श्रीराम मंदिर येथे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार संदीप बुवा मांडके यांचे कीर्तन होणार असून त्यांना तबला साथ ज्ञानेश्वर दुधाणे, हार्मोनियम साथ वैभव केंगार हे करणार असून भाळवणी व परिसरातील शिष्य मंडळी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच ३ डिसेंबर रोजी काशिनाथ महाराज पुण्यतिथी साजरी होणार असून १३ कोटी रामनामाचा संकल्पपूर्ती सोहळा संपन्न होणार आहे.पुण्यतिथी साजरी करण्यासाठी सद्गुरू काशिनाथ महाराज शिष्य परिवार आणि अरुणोदय सेवा न्यास अधिक परिश्रम घेत आहेत.