सातारा प्रतिनिधि अनिल वीर
पाडळी (केसे), तालुका कराड गावचे सुपुत्र, आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून कराड तालुक्याला ओळख असणाऱ्या विश्वास मोहिते यांची सातारा जिल्हा अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक समिती या जिल्ह्याच्या समितीवर निवड करा अशी मागणी तमाम सातारा जिल्ह्यातील मातंग समाजाकडून केली जात आहे.
विश्वास मोहिते यांनी आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यासह,सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील मातंग तसेच बहुजन समाजावरती होणाऱ्या अन्याया अत्याचाराच्या विरोधात सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर विविध वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी आपल्या निर्भीड आणि निस्वार्थ लेखणीच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून दिला आहे. राज्य शासनाचे अधिकृत समितीवरती त्यांची निवड झाल्यास समाजाला अधिक प्रभावीपणे न्याय देता येईल. समाजासाठी असणाऱ्या पदाचा उपयोग करून, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार सत्ता ही समाज परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे समितीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सत्तेच्या माध्यमातून विश्वास मोहिते यांना काम करता येईल.
विश्वास मोहिते यांच्या सामाजिक राजकीय आणि पत्रकारितेच्या माध्यमातून असणाऱ्या अनुभवाचा, आणि समाजसेवी वृत्तीचा विचार करून विश्वास मोहिते यांना सातारा जिल्ह्याच्या अनुसूची जाती जमाती प्रतिबंधक समिती वरती सदस्य व निवड करा अशी मागणी सातारा जिल्ह्यातील तमाम मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.