भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री शाकंभरी देवी मंदिराच्या आवारात गुणवंत विद्यार्थी, शासकीय सेवेत नवीन नियुक्ती व पदोन्नती मिळवलेले अधिकारी यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक कोंडीबा गाढवे तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अति मुख्य कार्यकारी अधिकरी इंद्रजित देशमुख हे उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रतीक हणमंत पव्हाळकर (पशुधन विकास अधिकारी), प्रभाकर सुनिल म्हेत्रे (सहाय्यक अभियंता नगर रचनाकार), निरंजन देशमुख (पोलीस उपनिरीक्षक व तालुका कृषी अधिकारी), ज्ञानेश्वर माने (वीज महावितरण अभियंता), शंकर रामचंद्र शिंदे (पोलीस उपनिरीक्षक), राजेंद्र वाघमारे (मंडल अधिकारी), रवींद्र कुचेकर (मुबई पोलीस) डॉ. ओंकार बाळासाहेब शिंदे (एम.बी.बी.एस. प्रवेशपात्र), डॉ. प्रियंशु अरुण म्हेत्रे (एम.बी.बी.एस. प्रवेशपात्र),शिक्षक सुरेश नारायण शिंदे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी इंद्रजित देशमुख म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडीलांचे नाव मोठे केले पाहिजे,त्याकरिता कठोर परिश्रम घेतले पाहिजेत.जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात केली पाहिजे.गावातील पाच प्रकारचे लोक एकत्र आले तर गावाची चांगली मुठ बांधली जाते आणि गावाचा विकास चांगला होतो. पडद्यावरचे जग हे आभासी जग आहे.याचा विचार केला पाहिजे.विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरणे बंद केले पाहिजे आणि अभ्यास जास्त केला पाहिजे.इतरांच्या पेक्षा वेगळे जग आपण निर्माण केले तरच आपले नाव होते. संध्याकाळी परिवारातील सर्वांनी एकत्र येऊन चर्चा केली तर अनेक गोष्टी चांगल्या प्रकारे सुटू शकतात.असे ही देशमुख म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल म्हेत्रे यांनी केले तर आभार धनंजय धोत्रे यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी रावसाहेब गवळी,दिलीप भानवसे,डॉ.नंदकुमार जगताप,डॉ.धनंजय पवाळकर,विजय शिंदे,शिवाजी शेंडगे,नितीन शिंदे,अमोल लिंगे,राहुल ताटे,प्रशांत माळवदे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास विध्यार्थी, पालक,अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.