मुंबई प्रतिनिधी
नुकतेच अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघ नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष महेशजी ढवळे यांनी शिंपी समाजाच्या प्रलंबित मागण्यांविषयीचे निवेदन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच अन्न पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांना सादर केले होते.
त्याचे फलित आता लवकरच दिसायला लागत असून महाराष्ट्रातही लवकरच शिवणकाम कारागीर बांधव भगिनीसाठी शिलाई कढाई बोर्ड स्थापन करण्यासाठी शासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचे संकेत मिळाले असून महेश ढवळे यांच्या प्रयत्नांना यश मिळत असून त्याचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले जात आहेत.
अशी माहिती प्रसिद्ध प्रमुख संतोष मुळे यांनी दिली आहे.