नाशिक प्रतिनिधी
सुंदर गोविंद वाणी मित्र मंडळ तर्फे घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेला गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला.परिसरातील 30 स्पर्धकांनी यांमध्ये सहभाग नोंदवला.
वैविध्यपूर्ण कल्पनेने साकारलेले तसेच आकर्षक आरास व पर्यावरणास समर्पित करणारे देखावे थक्क करणारे होते.गणेश भक्तांचा उत्साह व गणेशाप्रति अपार श्रद्धा यातुन दिसुन आली.या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यास आम्हांस अतिशय आनंद होतो आहे.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:-
1. प्रथम क्रमांक रुपये 3100/-
श्री प्रदिप पी.तलवारे गोविंद नगर.
2.द्वितीय क्रमांक रुपये 2100/-
श्री मधुकर गोविंद वाणी उंटवाडी.
3.तृतीय क्रमांक रुपये 1100/-
श्री हर्षल नकुल येवला ईच्छामणी कॉलनी.खोडे मळा.
4.चतुर्थ क्रमांक रुपये 1100/-
श्री योगेश जगन्नाथ फुलदेवरे रामल्या सृष्टी, कर्मयोगी नगर.
5.पाचवा क्रमांक रुपये 1100/-
अनंत मधुकर धामणे गोविंद नगर सर्व विजयी स्पर्धकांचे तसेच सर्व सहभागी स्पर्धकांचे सुंदर गोविंद वाणी मित्र मंडळाकडून मनःपूर्वक आभार मानले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सचिव संदीप देव उपाध्यक्ष शांताराम भदान अध्यक्ष निंबा अमृतकर खजिनदार रवींद्र सोनजे, पाटकर तात्या, सचिन राणे यांनी अथक परिश्रम घेतले .