मारापूर प्रतिनिधी
'१ तास, १ घंटा ' माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी हजारो हातांचा श्रम यज्ञ आज प्रत्यक्षात पार पडला.स्वच्छतेला गती आता तुमच्याच हाती आहे, गावच्या शाश्वत स्वच्छतेची प्रगती ही
महाश्रमदानात सहभागी झालेल्या युवकांच्या हाती आहे अशी माहिती मारापूरचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांनी दिली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छतेसाठी श्रमदान करून आपला गाव,शहर व परिसर सुजलाम,सुफलाम करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन यादव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
या स्वच्छता कार्यक्रमासाठी मारापूर चे लोकनियक्त सरपंच श्री विनायक मा.यादव, उपसरपंच अशोक आसबे, चेअरमन राजकुमार यादव, बाळासो यादव, ग्रामपंचायत सदस्य नाथा माने, सिद्धेश्वर यादव, अनिल माने, सिद्धनाथ माने, अभिमान माने, हरी यादव गवळी, सतीश वाघमारे व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ तसेच प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.