मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
आमोदिनी फाउंडेशन तर्फे दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्त पौड येथील स्वामीनिवास वृद्धाश्रम येथे भेट देऊन तेथील ज्येष्ठां समवेत संवाद साधण्यात आला. तसेच स्वामिनीवास वृद्धाश्रम यास आमोदिनी मैत्र परिवारातर्फे तसेच वैयक्तिक दृष्ट्या फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करण्यात आली.याप्रसंगी आमोदिनी फाउंडेशन तर्फे अध्यक्षा ॲड . अनिशा फणसळकर सचिवॲड . संध्या बागुल तसेच सभासद ॲड. प्रज्ञा वैद्य. आणि देवानंद बागुल उपस्थित होते.
आमोदिनी फाउंडेशन तर्फे यावेळी वृद्धाश्रमात गरजेच्या वस्तू सेवा म्हणून देण्यात आल्या. तसेच एडवोकेट अनिशा फणसळकर आणि प्रज्ञा वैद्य तसेच ॲड. अश्विनी कळंबकर यांनी एकत्रितपणे वृद्धाश्रमास तांदूळ, पीठ, साखर इत्यादी गरजेच्या वस्तू दिल्या. याप्रसंगी आमोदिनी फाउंडेशन तर्फे सर्व वृद्धांस शाल भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर शाली ॲड अनिशा आणि सभासद सौ. नीता गुर्जर यांनी भेट दिल्या. एडवोकेट संध्या बागुल आणि देवानंद बागुल या दाम्पत्याने त्या दिवशीचे वृद्धाश्रमातील रात्रीचे जेवणाची सोय त्यांचे मार्फत केली. तसेच सर्वांनी आपापल्या परीने छोटी रक्कम वृद्धाश्रमास मदत स्वरूपात दिली.
ॲड अनिशा फणसळकर, संध्या बागुल आणि प्रज्ञा वैद्य यांनी तेथील वृद्धांशी संवाद साधत विचारपूस केली. त्याप्रसंगी आश्रमातील ज्येष्ठ व्यक्तींनी संवाद साधत आम्ही आल्याचा आनंद व्यक्त केला. सर्वच ज्येष्ठ खूप प्रतिकूल परिस्थितीतून तिथे दाखल झाले आहेत मात्र आता त्यांची स्थिती आणि मनस्थिती उत्तम असून संस्थेच्या संस्थापक गौरी धुमाळ आणि संस्थेचे सर्व काम पाहणारे प्रशांत दादा सर्व वृद्धांची खूप आपुलकीने व प्रेमाने काळजी घेत आहेत.
मानसिक स्वास्थ्यदिनाच्या दिवशी अशाप्रकारे वृद्धांशी संवाद साधून आणि त्यांना आपल्या परीने खारीचा वाटा पोहोचवून आमोदिनी संस्थेस खूप आनंद झाला.
आमोदिनी संस्था वेळोवेळी गरजू गरीब वृद्ध व निराधार लोकांस मदतीकरता तत्पर असते. आमोदिनी संस्थेत सर्व पदाधिकारी व सभासद हे वकील व समुपदेशक असून वेळात वेळ काढून संस्थेतर्फे समाजाकरता वेळोवेळी असे उपक्रम राबवले जातात.