करकंब प्रतिनिधी
नुकतीच एकलव्य अभ्यासिका सुरू होत असताना या अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण, व्हायफाय सुविधा, विविध स्पर्धा परीक्षेची एडव्हान्स पुस्तके, सीसीटीव्ही कॅमेरे,लाईट गेल्यास इन्व्होटरची सोय,तीन महिन्यातून गेस्टलेक्चर,पिण्याचे शुध्दपाणी, वर्तमानपत्र,पुरेशी प्रकाश यंत्रणा,प्रत्येकाला स्वतंत्र कंपार्टमेंट, असल्याने करकंब मधील विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा सुंदर प्रतिसाद मिळत आहे, मनापासून अभिनंदन. तेंव्हा विविध स्पर्धा परीक्षेच सखोल ज्ञान मिळवण्यासाठी किंवा अधिक माहिती जाणून घेण्यासाठी करकंब मध्ये प्रथमच स्पर्धा परीक्षांच्या बसलेल्या विद्यार्थ्यांचा कल्पवृक्ष रयत प्रबोधिनी पुणे संस्थापक श्रीउमेश कुदळे सरांचे अप्रतिम मार्गदर्शन दिनांक ५ ऑक्टोंबर रोजी सकाळी १०:१५वा.श्री चौंडेश्वरी मंदिर सोमवार पेठ करकंब येथे ऐकायला मिळणार असून सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनीनी व जागृत पालकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून अनमोल मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन एकलव्य अभ्यासिका करकंब यांचे वतीने करण्यात येत आहे.
यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सर्व हायस्कूल प्रशालेचे प्राचार्य हेमंत कदम,प्राचार्य अजित पवार,प्राचार्य किसन सलगर , प्राचार्या विजया उंडे ,मुख्याध्यापिका संगीता करमाळकर,यांची उपस्थिती राहील,अधिक माहिती साठी 9767776858किंवा 9561251505 या नंबरवर संपर्क साधावा.