पंढरपूर प्रतिनिधी
विभागीय कूस्ती व जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित, श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय सुस्ते प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
विभागीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज सुनील शिंदे याने ग्रीको रोमन कुस्ती प्रकारामध्ये ७० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक तर यश तानाजी मगदूम याने ७० किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून प्रशालेचे नाव उंचावले आहे.
बॉक्सिंग स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात जयराज जालिंदर चव्हाण,संग्राम परमेश्वर कांबळे,सुहास उमेश चव्हाण,श्रेयश गणेश कदम यांनी गोल्ड तर वेदांत शिवाजी रणदिवे याला सिल्व्हर मेडल मिळाले.१७ वर्षे वयोगटात प्रतीक पांडुरंग चौधरी यास गोल्ड मेडल तर सिद्धार्थ परमेश्वर कांबळे,कौस्तुभ धनंजय लोकरे यास सिल्व्हर मेडल मिळाले.१९ वर्षे वयोगटात अविनाश भीमा खंडाळे, संकेत तानाजी मोरे,यश सतीश चव्हाण यांना गोल्ड मेडल मिळाले.
मुलींच्या १९ वर्षे वयोगटात जान्हवी जालिंदर चव्हाण, दिव्या आनंद चव्हाण, सुहासिनी उमेश चव्हाण यांना गोल्ड मेडल तर मानसी अनिल वाघमारे, ईश्वरी दिलीप चव्हाण हीस सिल्व्हर मेडल मिळाले.
१९ वर्षे वयोगटात सानवी संजय चव्हाण हीस सिल्व्हर मेडल मिळाले.मोस्ट प्रॉमिसिंग बॉक्सर म्हणून सुहासिनी उमेश चव्हाण हीला गौरविण्यात आले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशालेचे प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे, पर्यवेक्षक रणजित शिनगारे जेष्ठ शिक्षक विलास दराडे, सुरेश कट्टे, धनंजय भाजीभाकरे,लिपीक किरण बोधले, संजय निंबाळकर यांचे हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैनुद्दीन शेख यांनी केले तर आभार प्रथमेश गावडे यांनी मानले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर सचिव ॲड.वैभव टोमके, उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर, जेष्ठ संचालक दिलीप घाडगे,अनिरुद्ध सालविठ्ठल,आप्पासाहेब चोपडे, मुकुंद देवधर, विजयकुमार माळवदकर,सौ.सुनिता मोरे आदींनी अभिनंदन केले.यावेळी जेष्ठ लिपीक राजकुमार ढगे व सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.