खडकी प्रतिनिधी
अग्रसेन महाराज यांची जयंती मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करण्यात आली. आगरवाल समाज खडकी येथे अग्रसेन महाराज आणि देवीची आरती प्रमुख पाहुणे संजय अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाली, यावेळी उपस्थितांना भव्य प्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमांमध्ये सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला व फलहारी भंडारा करण्यात आला.
यावेळी समाजाचे अध्यक्ष दीपक अग्रवाल, उपाध्यक्ष पवन अग्रवाल, सचिव राहुल अग्रवाल, कोषाध्यक्ष मनीष गोयल, भांडार प्रमुख प्रमोद बंसल, उत्सव प्रमुख पूर्णेश अग्रवाल, सुभाष अग्रवाल, आनंद भगतराम, इंद्रकुमार बन्सल, विजय ब्रम्हानंद, अनुप गोयल, राणी गर्ग, सीमा अग्रवाल, सुमन अग्रवाल, रिमा गोयल, रिना बन्सल,एड. पूजा सहारे, एड. संगीता गवळी आदी महिला वर्ग तसेच भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


