गादेगाव प्रतिनिधी
श्रीकृष्ण जयंतीनिमित्त राज्यभरात गोपाळकाला मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जुन्या रुढी परंपरा जोपासावी या उद्देशाने दरवर्षी विद्यालयांमध्ये विविध प्रकारचे सण उत्सव साजरे केले जातात .यामध्ये गोपाळकाला असेल गणेश उत्सवाचे किंवा इतर कोणताही सण असेल. असे विविध सण साजरे करून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या सणाविषयी गोडी निर्माण व्हावी त्या सणाचे महत्त्व समजावे यासाठी आज विद्यालयांमध्ये प्रत्यक्ष दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .दहीहंडी मध्ये कॉलेजमधील तरुणींनी व लहान विद्यार्थ्यांनी भाग घेऊन दहीहंडी फोडण्याचा उपक्रम राबवला. हि दहीहंडी फोडण्यासाठी तीन थर लावण्यात आले .
यामध्ये जुनिअर कॉलेजच्या मुलींनी भाग घेतला होता. हि दहीहंडी मुलींनी फोडली या उपक्रमासाठी सहशिक्षक वर्षा मोरे, सीमा रकटे, मोनाली गायकवाड , मसरूद्दीन पटेल, राजेंद्र मोलाणे ,संतोष पवार ,नागेश कांबळे, अजय मोरे यांनी परिश्रम घेतले सर्व विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी गोपाळकाला निमित्त शुभेच्छा दिल्या . या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने लहान विद्यार्थ्यांनी आपली वेशभूषा वेगवेगळ्या प्रकारे केली होती यामुळे या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते .लहान मुलींनी गोपी का राधा अशी वेशभूषा केली होती.