नंदुरबार प्रतिनिधी
पंढरपूर येथे अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघ नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य यांचा सर्वसाधारण सभेत उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हयाचे अध्यक्ष पद वैभव नारायण करवंदकर यांना देण्यात आले. संत शिरोमणी श्री. नामदेव महाराजाचे १६ वे वंशज ह. भ. प. मुकुंद महाराज नामदास तसेच महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जाचे ) तथा अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघ नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष महेश जी ढवळे यांचा हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
पंढरपूर येथे अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघ नवी दिल्ली, शाखा महाराष्ट्र राज्य यांची पहिली सर्वसाधारण सभा दिनांक ०३ सप्टेंबर रविवार रोजी सकाळी १० ते ०५ या वेळेत योगा भवन पंढरपुर येथे आयोजित करण्यात आली होती. तेथे भारतातील १५ राज्यांतून प्रतिनिधी मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्या सभेत अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नारायणराव पाथरकर , मुख्यसचिव जयसिंगपुर येथील महादेवराव खटावकर , महाराष्ट्र राज्य संघटक जळगाव येथील मनोज भांडारकर तसेच ओरीसा बंगाल येथून महेंद्र दर्जी , उत्तराखंड येथून राकेश आर्य , हरिद्वार हरियाणा येथून मुकेशजी नामदेव , मध्य प्रदेश येथून अरुण नामदेव, चेन्नई येथून महेंद्र तांडी, सुरत गुजरात येथून रमेश परमार , गोवा येथून रमेश भीमे , एस एस टोनी, श्रीमंती रेखा वर्मा , बलजीतसिंग खुरपा, राजपाल जी, अनिल गचके, नंदकुमार कोडनुसार, दिनकर पतंगे, कैलास धोकटे , संतोष मुळे, राजेंद्र धोकटे, गणेश उंडाळे आदि मान्यवर उपस्थिती महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्हाचे अध्यक्ष पदाची जबाबदारी वैभव नारायण करवंदकर यांना दिली. तर जळगाव प्रमुख पदी पाचोरा येथील राजेंद्र शिंपी यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले.
महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. जी. पाथरकर म्हणाले की, आपल्या मध्ये असलेले संस्कार, नम्रता, शिंपी समाज आणि संत नामदेव महाराज यांच्या प्रती असलेली श्रद्धा, आपल्याकडील संघटन कौशल्य आणि सामाजिक प्रश्नांची जाण तसेच आपण समाजात करीत असलेल्या समाजोपयोगी कामाचा विचार करुन आपल्या या गुणांचा संपुर्ण महाराष्ट्रतील तसेच आपल्या जिल्हातील, तालुक्यातील, शहरातील शिंपी समाजाच्या एकतेसाठी उपयोग व्हावा यासाठी आपली अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ, शाखा महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे. आपले मन. पुर्वक अभिनंदन व आपल्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा...!