कडेगांव प्रतिनिधी
कडेगांव जिल्हा सांगली येथील संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सकाळी एक दिवसाचं ज्ञानेश्वरी पारायण, दु ३ ते ५ भजन, ५ ते ६ श्रीमती उज्वलाताई भुतकर (ठाणे) व्याख्यान, ९/३० वाजता ह.भ.प ज्योतीताई कावरे यांचं श्रीकृष्ण जन्माष्टमी विषयावर किर्तन संपन्न झाले.
यावेळी अध्यक्ष जयंत वेल्हाळ, उपाध्यक्ष मानव परदेशी, खजिनदार संजय महाडीक,अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली,राज्य महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख संतोष मुळे,माजी अध्यक्ष सुनील भस्मे, माजी उपाध्यक्ष महेश पतंगे,श्रीधर बकरे,संजय लाटोरे,निलेश वेल्हाळ,सागर लाटोरे, चंद्रकांत लाटोरे,सोमनाथ वेल्हाळ, सचिन कराडकर सर्व शिंपी समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.