सोलापूर प्रतिनिधी
रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी * शिक्षकदिना निमित्त मनोरमा परिवार अंतर्गत शोभाश्री मल्टी डेव्हलप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सोलापूर कडून* दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र धोत्री येथील श्री. भगवती गौरीमाता प्रशाला,कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास,राज्यशास्त्र व समाजशास्त्र विषयाचे ज्येष्ठ प्राध्यापक *श्री.स्वामीनाथ सिद्धप्पा कलशेट्टी. (शिंगडगावकर) यांना सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. मा.श्री शिवाजी शिंदे,यांच्या शुभहस्ते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री बाळासाहेब शेळके,यांच्या अध्यक्षतेखाली *शिक्षकरत्न * पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी मा.अशोक भांजे साहेब,उद्योजक लिंगराज विंचुरे, उद्योजक महेश भंडारे,निवृत्त अधिकारी विश्वनाथ आमाणे, व्यवस्थापकीय संचालक किरण पुजारी,चेअरमन धर्मराज बळ्ळारी बाबासाहेब मळगे, शिवानंद उण्णद आदी मान्यवर उपस्थित होते. इतिहास अभ्यासक, व्याख्याते, निरुपणकार, पर्यावरण प्रेमी,पालक विद्यार्थीप्रिय,जेष्ठ प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी सरांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे आजपर्यंत त्यांना एकूण 100 पुरस्कार मिळाले.
आज सरांना 100 व्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्राध्यापक कलशेट्टी सरांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये नामवंत पदावर कार्यरत आहेत.परमपूज्य श्री होटगीश्वर स्वामींजींचा कृपा आशीर्वाद सदैव त्यांच्यावरआहे. सरांच्या गौरवामुळे *श्री.काशीपीठाचे जगद्गुरु श्री.श्री.श्री1008 ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी* श्री बृहन्मठ होटगी मठाचे अध्यक्ष श्री. बालतपस्वी चन्नयोगि राजेंद्र शिवाचार्य महास्वामींजी शुभाशीर्वाद दिले.
संस्थेचे सचिव मा.श्री.शांतय्या स्वामी सर,सर्व पदाधिकारी,प्राचार्य, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक. पर्यवेक्षक,प्राध्यापक,शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, मित्रपरिवार समस्त ग्रामस्थ आदिनीं मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन, कौतुक करून अशीच यशस्वी वाटचाल यापुढील काळात होत राहो अशी सदिच्छा व्यक्त केले.