पंढरपूर प्रतिनिधी
पं.विकास कशाळकर फाऊंडेशन पंढरपूर यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीत मैफिलीस जाणकार पंढरपूर कला रसिकांना पं विकास कशाळकर यांनी मंत्रमुग्ध केले
सुरवातीला पं.विकास कशाळकर, अध्यक्ष डॉ प्रसाद कुलकर्णी सचिव ज्ञानेश्वर दुधाणे,माधुरीताई जोशी, आण्णासाहेब सुरवसे,मिलिंद परिचारक रामदास रोंगे,धनंजय मनमाडकर प्रज्ञा कुलकर्णी,यांच्या शुभहस्ते विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.मुख्य कलाकारांचा सत्कारा नंतर गायनाला सुरुवात झाली
सुरुवातीला राग मिया मल्हार रागात बडा ख्याल विलंबित तिलवाडा तालात गाऊन रसिकांना अभिजात शास्त्रीय स्वरांचा आनंद दिला.त्यानंतर चारुकेशी रागातील बडाख्याल आणि त्याला जोडून बंदिश गायली,त्यानंतर काफी कानडा,हंसध्वनी रागातील बंदिशी सादर केल्यानंतर शेवटी भैरवीतील भज मन राम चरण अभंगरचना गाऊन मैफिलीची सांगता केली,त्यांना तितकीच अप्रतिम आणि गोड साथसंगत तबला ऋषिकेश सुरवसे हार्मोनियम श्रीरंग जाकी,आणि स्वरसाथ परिमल कोल्हटकर यांनी देऊन मैफलीत रंग भरला,यावेळी रामदास रोंगे यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयच्या वतीने संगीत सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी पंढरपूर,सांगोला, करकंब, मंगळवेढा,येथील अनेक संगीत रसिकांनी उपस्थिती दर्शविली होती.
या कार्यक्रमाचे सुंदर निवेदन पंढरपूर केंद्र संचालक राजेश खिस्ते यांनी केले.मैफिल यशस्वी करण्यासाठी प्रज्ञा कुलकर्णी ऋचा कुलकर्णी,ओजस अंबिके,वेद परमार,उमेश केसकर,महिला भिशी मंडळ आदींनी अधिक परिश्रम घेत मैफिल यशस्वी केली.