सोलापूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित, श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेमध्ये आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन व संस्थेचे माजी संस्था उपाध्यक्ष कै.पां.के वाघ गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याही प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे,पर्यवेक्षक रणजीत शिनगारे,जेष्ठ शिक्षक विलास दराडे, जेष्ठ लिपीक राजकुमार ढगे यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुष्पहार,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जिल्हास्तरीय वुशू व कुस्ती स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
शिक्षकदिनाबद्दल प्रशालेतील विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
प्राध्यापक संदीप चौधरी,सौ.प्रतिभा जावीर यांनी विद्यार्थ्यांना उपदेशपर मौलिक विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे समारोप प्रसंगी प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे यांनी छत्रपती शिवाजी महाराज,थोर समाजसुधारक महात्मा फुले, , सावित्रीबाई फुले,विश्वरत्न,भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, नेल्सन मंडेला या महामानवांच्या कार्याचा गौरवपुर्ण उल्लेख करुन स्वातंत्र्य,समता, बंधुता,न्याय, शिक्षण आणि चारित्र्य संपन्नता हे गुण विद्यार्थी दशेतच वृद्धिंगत करुन शांतता,संयम,सहनशीलता या गुणांमुळे व्यक्तीचा स्व विकास व राष्ट्राची जडणघडण होते हे छत्रपती शिवाजी राजे, सावित्रीबाई फुले,नेल्सन मंडेला यांच्या कार्याचे उदाहरण देऊन पटवून सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ, सचिव ॲड.वैभव टोमके, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर,जेष्ठ संचालक दिलीप घाडगे,अनिरुद्ध सालविठ्ठल,आप्पासाहेब चोपडे, मुकुंद देवधर, विजयकुमार माळवदकर आदींनी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.