माढा प्रतिनिधी
माढा तालुक्याचे पाणीदार आमदार म्हणून ख्याती असलेले बबनदादांचा ७२वा वाढदिवस त्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना १लाख वह्यांचे वाटप करण्यात आले आहे.
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक वसेकर उपाध्यक्ष नितीन वसेकर मुख्याध्यापक किरण ढोबळे,सहशिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे मा.अध्यक्ष बिभिषण वसेकर पालक दत्तात्रय वसेकर, मच्छिंद्र वसेकर,शंभू वसेकर,तसेच ग्रामपंचायत सदस्या सुदामती माळी, संगीता वसेकर,विद्याताई वसेकर, वर्षा वसेकर,उषा वसेकर,नीलावती सरक,,रुपाली माळी,सविता वसेकर, अश्विनी वसेकर,आदी महिलांच्या उपस्थित वह्यांचे वाटप करण्यात आले.
तसेच माढा तालुक्यातील शेतकरी राजाच्या सदैव पाठीशी उभे असणारे बबनदादांच्या माध्यमातून मोठ काम होत असताना आज माढा येथे कायमस्वरूपी नेत्रालयाचा शुभारंभ होत आहे,तसेच प्रत्येक गावोगावी भव्यदिव्य रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले.
त्यालाही सर्व तालुक्याच्या वतीने मोठा प्रतिसाद मिळत आहे.अशा लोकसेवक बबनदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.तसेच पुढील शनिवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकरवस्ती येथे बाजार डे या सुंदर उपक्रमाचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून त्यासाठी सर्व पालकांनी सहकार्य करावे असे शिक्षक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले.