सोलापूर प्रतिनिधी
एस व्ही सी एस हायस्कूल आणि ज्यु कॉलेज, बोरामणी या प्रशालेत गणेशोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत प्रा स्वामीनाथ कलशेट्टी यांनी "विद्यार्थ्यांचा धर्म "या विषयावर व्याख्यान दिले.
श्री गणेश पूजनानंतर दिलेल्या व्याख्यानात प्रा स्वामीनाथ कलशेट्टी यांनी विद्यार्थ्यांनी अध्ययन करत असताना कोणती गुणवैशिष्टये अंगी बाळगावित व अंगभूत कौशल्यांचा कसा विकास साधावा, विध्यार्थ्यानी आपला विदयार्थी धर्म कसा जतन करावा याबाबत आपल्या अतिशय उपयुक्त मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अतनुरे ,पर्यवेक्षक बिराजदार एस ए , सांस्कृतिक विभाग प्रमुख व्हनकडे आणि इयत्ता 10 वी वर्गास शिकवणारे शिक्षक -शिक्षिका उपस्थित होते.