पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित, श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय,सुस्ते ता.पंढरपूर येथे महाराष्ट्र शासन व पशूवैद्यक प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने लम्पी जनजागृती अभियाना अंतर्गत प्रशालेत कार्यक्रम घेण्यात आला. जेष्ठ पशुवैद्यक प्रतिष्ठान पंढरपूर चे डॉ.विश्वासराव मोरे व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन पंढरपूर डॉ.सत्यवान भिंगारे, पशूधन पर्यवेक्षक डॉ. संजय देशपांडे, डॉ.ऋषिकेश रसाळे, गणेश पवार हे प्रमुख उपस्थित होते. या मान्यवरांचा सत्कार प्रशालेचे प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे व पर्यवेक्षक रणजित शिनगारे यांनी केला.डॉ.मोरे व डॉ.भिंगारे यांनी जनावरांना होणा-या लम्पी या आजाराबद्दल सविस्तर माहिती देऊन पशूपालकांनी व शेतकऱ्यांनी आपले पशुधन वाचविण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत, प्राण्यांची कशा प्रकारे निगा राखली पाहिजे,त्यांची स्वच्छता, आजारपणात जनावरांची काळजी व देखभाल याबाबत मार्गदर्शन व प्रबोधन केले.शासनामार्फत पशूसंवर्धन व त्यांचा विकास याबाबत करण्यात येणारे उपाय, राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ.देशपांडे व डॉ.रसाळे यांनी प्राणी आहार-चारा याविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मान्यवरांनी उत्तरे दिली.ग्रामीण भागाला उपयुक्त अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, सचिव ॲड.वैभव टोमके, उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर, जेष्ठ संचालक दिलीप घाडगे, अनिरुद्ध सालविठ्ठल, आप्पासाहेब चोपडे, मुकुंद देवधर, विजयकुमार माळवदकर आदी संस्थेचे पदाधिकारी यांनी प्रशालेचे प्राचार्य पिसे व पर्यवेक्षक शिनगारे व प्रशालेचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.