केसकरवाडी प्रतिनिधी बिरदेव केंगार
गौरी गणपतीच्या सणा निमित्त पात्र कार्ड धारकांना आनंदाचा शिधा 100 रुपया मध्ये प्रामुख्याने गोडेतेल, साखर, हरभरा डाळ,गरा या चार वस्तू अल्प दरात, वाटप सुरु असून पात्र कार्ड धारकांनी आनंदाचा शिधा व मोफत रेशन घेऊन जावे असे आव्हान स्वस्त धान्य दुकानदार लहू रामचंद्र केसकर यांनी केले आहे
यावेळी केसकरवाडी गावचे प्रथम नागरिक सरपंच रूपालीताई प्रकाश केसकर, संभाजी सुदाम केसकर,हणमंत भीमराव केसकर, मा. सरपंच अभिमान केसकर, तानाजी केसकर,धनाजी गोफणे,अर्जुन केसकर,नवनाथ केसकर, शालन जाधव, पारुबाई केसकर,बिरदेव केंगार इत्यादी उपस्थित होते.