मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
गांधी बाल मंदिर हायस्कूल कुर्ला पश्चिम या शाळेतील शिक्षक उत्तम कोळंबेकर यांना दिंनाक १७ सप्टेंबर रोजी कामोठे येथे कॉमेडी किंग जॉनी रावत आणि मराठी अभिनेत्री नयन कदम यांच्या हस्ते राष्ट्रस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन कला साधना या सामाजिक संस्थेकडून गौरविण्यात आले.
मागील ३० वर्षापासून उत्तम सर या शाळेत ज्ञानदानाचे कार्य करीत असून आतापर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले असून ते विद्यार्थी प्रिय शिक्षक आहेत.. करोना काळात त्यांनी उल्लेखनीय काम केले असून कायमच ते गोर गरीब वंचित यांच्यासाठी झगडत असतात.याआधी देखील त्यांना अनेक संस्थांकडून पुरस्कार मिळालेले आहेत.हा राष्ट्र स्तरीय पुरस्कार मिळाल्याने शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर वृंद आणि समजतील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.