मारापूर प्रतिनिधी
गाव-गाड्यातील सर्वसामान्य जनतेच्या सार्वजनिक व वैयक्तिक जीवनातील अडी-अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे कर्तबगार लोकप्रतिनिधी आमदार मा.श्री. समाधान दादा आवताडे यांनी गावभेटीचा दौरा करुन आपल्या सर्वसमावेशक कार्य नैतिकतेला जन दरबारी अधिक विस्तृतपणे वाव दिला.
या दौऱ्यादरम्यान मंगळवेढा तालुक्यातील मौजे मारापुर येथील माय-बाप जनतेने आपल्या दैनंदिन व्यवहारातील अनेक समस्यांना वाचा फोडून आमदार यांच्याकडे आपल्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची साद घातली. त्यामध्ये प्रामुख्याने पिढ्यान पिढ्या रखडलेल्या मारापुर- आसबेवाडी- शेलेवाडी-आंधळगाव रस्त्यासाठी नऊ कोटी 50 लाख, नऊ बिगा-अकोला या रस्त्यासाठी पाच कोटी,संभाजीनगर या रस्त्यासाठी एक कोटी,हनुमान मंदिर सभा मंडपासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर आज ग्रामस्थांनी विजेच्या संबंधित नवीन डीपीला मंजुरी, जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेमध्ये मारापुर या गावाचा समावेश करण्यात आला, मारापुर तावशी या दोन्ही गावात दरम्यान बंधारा कम ब्रिज अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. सदर आढावा बैठकीनंतर मारापुर ग्रामस्थांच्या वतीने आमदार महोदय यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
सदर बैठकीसाठी सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी हजर होते.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा दौरा यशस्वी झाला. सदर दौऱ्यासाठी दामाजी कारखान्याचे व्हॉइस चेअरमन अंबादास कुलकर्णी, माझी संचालक सुरेश भाकरे, राजन पाटील ,भुजंगराव आसबे उपस्थित होते. मारापुर ग्रामस्थांच्या वतीने मारापूरचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या नेतृत्वाखाली जोरदार नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उपसरपंच अशोक आसबे,सोसायटीचे चेअरमन राजकुमार यादव,अमोल जानकर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भगवान आसबे ,विक्रम यादव सर्व ग्रामपंचायत सदस्य,सोसायटीचे सदस्य व मोठ्या संख्येने मारापुर ग्रामस्थ उपस्थित होते.शेवटी अशोक आसबे यांनी आभार मानले.