पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
कारागृहात जन्म घेऊनी वाढला तो नंदाघरी. जगोतराच्या पाळण्याची घरे यशोदा दोरी. रासचे तो गवळणी सोबत यमुने तीरी. संकट असो कोणतेही रक्षण तो सदैव करी. असे हे श्री कृष्ण हरी.
सुमारे दीडशे वर्ष पुरातन अशा चौफाळा येथील श्रीकृष्ण मंदिरात आज भल्या पहाटे श्रीकृष्ण दुग्धाभिषेक करून श्रीकृष्णाचे मूर्ती सभोवती फुलाची रंगीत आकर्षक रास करून तसेच मंदिरावर विद्युत रोषणाई व मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते भक्तांच्या समवेत भल्या पहाटे पूजा संपन्न झाल्यानंतर भाविकांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या तिसऱ्या पिढीतील सागर बडवे पियुष बडवे पप्पू बडवे हे दरवर्षी कृष्णाष्टमीला मंदिराची स्वच्छता करून गोकुळाष्टमीच्या निमित्ताने विविध फुलांच्या माळाने मंदिर व श्री कृष्णा भोवती फुलांची आरास केली जाते मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकास सुंठविण्याचा प्रसाद वाटला जातो.
भाविकांनी गोपाल कृष्णाचे दर्शन घेण्यासाठी भल्या पहाटेपासून श्रीकृष्ण मंदिरात रंग लावल्या होत्या गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम चालू होते दुसरे दिवशी मंदिरामध्ये श्री सत्यनारायणाची पूजा करून भाविकांना प्रसाद वाटून गोकुळाष्टमीच्या उत्सवाची सांगता करण्यात येते.