पंढरपूर प्रतिनिधी
डॉ.प्रकाश जयवंत पवार यांना, राष्ट्रीय आरोग्य दूत पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदरचा पुरस्कार . डॉ ज्योतीताई शेटे ( अध्यक्ष - महाराष्ट्र निसर्गोपचार तज्ञ परिषद) यांचे हस्ते, सोलापूर चे खासदार, डॉ. सिध्देश्वर महास्वामिजी यांचे उपस्थितीत देण्यात आला.सोलापूर - अक्कलकोट रोड वर वळसंग वाडा, निसर्ग विहार, येथे हा कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्र राज्य व भारत देशभरात निसर्गोपचार या आरोग्य क्षेत्रा मद्ये निरंतर सेवादान - योगदान, समर्पण या बद्दल हा पुरस्कार दिला जात आहे.
आरोग्यम् भारत, सी. एन. इ. टी., एस. एन.ओ., एन.डी.ए.व सोलापूर नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन सोलापूर, यांचे संयुक्त अभियाना अंतर्गत,या वर्षाचा दिला जाणारा, "राष्ट्रीय आरोग्य दूत पुरस्कार": 2023-24, देऊन डॉ प्रकाश जयवंत पवार सर यांना गौरविण्यात आले.
डॉ. पवार हे श्री धन्वंतरी निसर्गोपचार योगा ॲडव्हान्स्ड ॲक्युप्रेशर आयुर्वेदिक रिसर्च सेंटर लिंक रोड पंढरपूर च्या माध्यमातून रुग्णांची सेवा देतात.
यावेळी महाराष्ट्र व देशभरातील निसर्गोपचार तज्ञ डॉक्टरांना आरोग्य दूत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी SNO - SOLAPUR व आरोग्यम् भारत अंतर्गत CNET PROGRAM तसेच राष्र्टीय पूरस्कार सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे सोलापुर महानगरपालिकेचे आरोग्य उपअभियंता नीलकंठ मठपती उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्या बद्दल डॉ.सचिन सावंत,पत्रकार संतोष रणदिवे,डॉ.हरि भोसले,प्रशांत माळवदे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.