पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथे अखिल भारतीय नामदेव क्षत्रीय महासंघ नवी दिल्ली,शाखा महाराष्ट्र राज्य यांची पहिली सर्वसाधारण सभा दि ३/९/२०२३ रोजी पार पडली.
यावेळी कमलाकर किटे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.नारायण पाथरकर, प्रदेश अध्यक्ष महेश ढवळे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती,नामदेव महा वस्त्र,टोपी,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी एस एस टोनी,श्रीमंती रेखा वर्म,महादेव खटावकर, पांडुरंग दोभोळे,कैलास धोकटे,संतोष मुळे,मनोज भांडारकर,अनिल गचके,नंदकुमार कोस्बतवार,दिनकर पतंगे,हे उपस्थित होते.
यावेळी मीटिंग करिता खास बडनेरा (अमरावती)येथुन आपले अपंग समाज बांधव कमलाकर किटे,रा.बडनेरा,जि अमरावती येथून खास करून उपस्थित राहिले.त्यांनी स्वतःहून बडनेरा येथे श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे भव्य व दिव्य असे समाज मंदिर बांधले आहे. ते ही स्वखर्चाने ,कोणत्याही प्रकारची देणगी गोळा केली नाही.त्याच बरोबर समाज एकीकरणासाठी, महासंघाच्या मिटींगला ते आवर्जून उपस्थित राहिले होते.