सोलापूर प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे राज्य सरकार कढून सोडवले जात नाहीत पत्रकार सुरक्षा समिती वतीने
*जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना*
*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी*
*यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती*
*राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता*
*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा*
*पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना*
*अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे*
*पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे*
*पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे*
*खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी*
*पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण*
या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन उपोषण निवेदन व पत्रव्यवहार करत आहे पत्रकार सुरक्षा समिती ची सोलापूर येथे चिंतन बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष राम हुंडारे होते या बैठकीत राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
*पत्रकारांवरील हल्ले चिंतनीय बाब*
राज्यात बातमी लावण्यावरून वाळू माफिया गुटखा माफिया भूमाफिया त्याच बरोबर दारू मटका जुगार डान्स बार सह बेकायदेशीर धंदे करणारे बातमी लावण्यावरून पत्रकारांवर जीवघेणे हल्ले करतात सदरची बाब पुरोगामी महाराष्ट्र ला शोभणारी नसून बातमी लावण्यावरून हल्ले होत असतील तर पत्रकारिता करायची कशी ? असा प्रश्न निर्माण झाला असून मुख्यमंत्री महोदयांनी या बाबत जातीने लक्ष घालायला हवं अशी मागणी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी यावेळी केली
या चिंतन बैठकीला पत्रकार सुरक्षा समितीचे राज्य उपाध्यक्ष बाळकृष्ण सदाफुले जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पवार जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख जेष्ठ पत्रकार डॉ कीर्तीपाल गायकवाड जिल्हा समन्व्यक वैजिनाथ बिराजदार माजी जिल्हा संपर्क प्रमुख कादर शेख शहर समन्वयक श्रीकांत कोळी ऍड दिलीप जगताप दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद जनता संघर्ष न्यूज चे संपादक सिद्धार्थ भडकुंबे अशोक साबळे युनूस अत्तार विनायक कोरे परवेज मुल्ला मेहबूब कादरी अजहर बिजापुरे मिनाज इंगळगी इत्यादी उपस्थित होते.