छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे राज्य उपाध्यक्ष एडवोकेट सुधीर पाटसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर शहरातील सुभेदारी या शासकीय शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली.
यावेळी राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, राज्य उपाध्यक्ष दिलीप चितलांगे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हाध्यक्ष वैभव मिटकर, महानगर प्रमुख बिपीन नाईक, शहराध्यक्ष गजानन गौडा पाटील, आशिष सुरडकर, जिल्हा सचिव अनिकेत निलावार, महिला आघाडीच्या लीलाताई राजपूत, रिनाताई राठोड इत्यादी उपस्थित होते.