भाळवणी प्रतिनिधी
भाळवणी ता.पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस च्या महीला अध्यक्षा राजश्रीताई ताड यांनी येथे रेशन धान्य दुकानातुन गरिबांना सुरळीत धान्य वाटप व्हावे व भाळवणी मंडल अधिकारी ऑफीस नियमीतपणे सुरू करावे यासाठी उपोषणास बसल्या आहेत या उपोषणास सोलापुर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते, कल्याणरावजी काळे यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली.
यावेळी संचालक सुनिल पाटील,संचालक सुरेश बापु देठे आदी भाळवणी ग्रामस्थ उपस्थित होते.