उदय वाघवणकर पालघर प्रतिनिधी
प्रो- गोविंदा २०२३ च्या अंतिम फेरीत ४८:४३ सेंकदात ८ थर रचून यशवीरित्या सलामी देत तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.आर्यन्स गोविंदा पथकाने याआधी सुद्धा अनेक महत्वाच्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे.
जोगेश्वरीतील अत्यंत तरुण असे हे गोविंदा पथक असून सामाजिक कार्यातही त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे तमाम जोगेश्वरीवासियांना त्यांचा अभिमान असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.