सोलापूर प्रतिनिधी
देशामध्ये बेरोजगारीची संख्या वाढत चालली आहे एकीकडे रेल्वे, बँका सरकारी यंत्रणांचे खाजगीकरण करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने सोलापूर शहर युवक काँग्रेस कडून भारताचे पंतप्रधान व बेरोजगारीचे जनक नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमीत्त अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य आमदार प्रणिती ताई शिंदे,महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दाजी गणपती,दत्तनगर चौकात सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांकडून चहाची केटली, पैसे मागण्याचा कटोरा, विविध घोषणाबाजी फलक घेऊन राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करण्यात आला.
2 कोटी युवकांना दर वर्षी रोजगार, नोट बंदी ,जी.एस. टी, बँकांचे खाजगीकरण,GDP चे ढासळण्याचे कारणामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे देशाची आर्थिक बाजू नाजूक झाली आहे. देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणे अग्निपथ योजनेसारखे फसव्या योजनेला युवा वर्ग कंटाळला आहे व सुशिक्षित बेरोजगार मोदींची कृपा, मोदी हटाव रोजगार बढाओ, मोदी हटाव देश का युवा बचाव अश्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे,प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर,प्रवीण जाधव, तिरुपती परकिपंडला,महेश लोंढे,शरद गुमटे,आकाश जांभळे, महेंद्र शिंदे,धीरज खंदारे, शशिकांत शेळके,अजिंक्य पाटील,यासार सय्यद,नागेश म्याकल,सुनील सारंगी, प्रतीक शिंगे,मनोहर चकोलेकर,चंद्रकांत नाईक,सचिन गायकवाड,गणेश देवसाने,युवराज दोडमनी, यासीन शेख व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

