ठाणे प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे चेअरमन असलेल्या शिवनेरीनगर सहकारी पतसंस्थेच्या मिरा रोड येथील शाखा क्रमांक दोन चे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सहकार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विजय जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मिरा भाईंदर विधानसभा अध्यक्ष संदीप राणे, सहकार सेनेचे महेश फरकसे, विजय शिंदे पाटील, मुनावर पवार, वैभव भोर, अनिल गरजे, ओवाळा माजीवाडा विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे इत्यादी उपस्थित होते.