पंढरपूर प्रतिनिधी
चला सखी नो चला चला जीवन पुष्प उजळाया चला पंढरीतील रुक्मिणी विद्यापीठ हे समाज परिवर्तनासाठी स्त्री शिक्षण हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून संस्था सतत सन 1992 पासून महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवत असते महिलांना आनंदी जीवन जगता यावे व सतत घर कामात असणाऱ्या महिलांना मंगळागौरीच्या निमित्ताने आपल्या मैत्रिणीबरोबर खेळण्याचा ,त्यांच्याशी गप्पा मारण्याचा आनंद घेता यावा.तसेच मनाला चपळता व चैतन्य मिळावे या उद्देशाने संस्था सचिवा सौ सुनेत्राताई पवार यांचे नेतृत्वाखाली शनिवार दिनांक 09/ 09 /2023 रोजी दुपारी 02=00 वाजता रुक्मिणी विद्यापीठाच्या प्रांगणात श्रावणसरी कार्यक्रमांतर्गत मंगळागौर खेळातील स्पर्धेचे आयोजन केलेले आहे .
यामध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्या संघास रु.10000/= द्वितीय क्रमांकास रुपये 7000/= चे रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
यासाठी प्रवेश शुल्क म्हणून रुपये 500 =00असून इच्छुकांनी पुढील मोबाईल क्रमांक...... 09175605133/08390316727/08379890357/07028107769 वर संपर्क करून आपली नाव नोंदणी त्वरित करावी असे संयोजिका सौ. सुप्रियाताई पवार, विभावरी डुबल व सविता लोखंडे या भगिनींनी केले आहे.