वसंतराव काळे आय.टी.आय. कॉलेज धोंडेवाडी येथे दीक्षांत समारंभ संपन्न.
पंढरपूर प्रतिनिधी
ध्येय निश्चित करून कृतिशीलतेला योग्य संगत व कष्टाची जोड दिली तर यशाची शिखरे पार करता येतात असे असे प्रतिपादन पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी केले. वसंतराव काळे औद्योगिक प्रशिक्षण संस्था धोंडेवाडी येथे आयोजित दीक्षांत समारंभ व यशस्वी उद्योजक सन्मान समारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार सुशील बेल्हेकर वसंतदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्याण काळे सहकार शिरोमणीचे माजी संचालक राजाभाऊ माने सुरेश देठे डॉ. अजित काळे तलाठी कैलास गुसिंगे संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब काळे गुरुजी वसंतराव काळे शैक्षणिक संकुलातील सर्व शाखांचे प्राचार्य व पालक उपस्थित होते.
पुढे बोलताना भोसले म्हणाले की विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी स्वयं प्रेरणेने प्रेरित होऊन न्यूनगंड न बाळगता आलेल्या संकटात धैर्याने संधी शोधली तर निश्चित ध्येयप्राप्ती होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुशील बेल्हेकर म्हणाले की विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार पालकांनी त्यांना करिअर करण्याची संधी देऊन पाठीशी खंबीर उभे राहिले तर मुले स्वतःची स्वप्ने पूर्ण करतात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षणाची सोय वसंतराव काळे आयटीआय कॉलेजच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याने गाव खेड्यातील मुले यशस्वी उद्योजक होत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की ग्रामीण भागातील मुलांच्या कौशल्यपूर्ण शिक्षणासाठी संस्था कटिबद्ध असून विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून शालेय शिक्षण घेत असताना नम्रता व प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर स्वतःची स्वप्ने पूर्ण होऊ शकतात विद्यार्थ्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवून आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे राहावे.
या समारंभ प्रसंगी पुणे विभागातील सातारा सांगली कोल्हापूर पुणे व सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल प्रसाद आप्पासाहेब शिंदे यशस्वी उद्योजक शुभम चोरमले सचिन पाटील काकासो सुरवसे समाधान साठे यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल सिद्धेश्वर जाधव गिरीश लंगोटे प्रवीण शिंदे ज्ञानेश्वर धनवडे रामकृष्ण झांबरे नीता पाटोळे जानकी कचरे गौरी तेलंगी यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष गुळवे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. समाधान काळे यांनी व उपस्थितांचे आभार निदेशक अनिल ननवरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व निदेशक- निदेशिका व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
ग्रामीण विद्यार्थी प्रसाद आप्पासाहेब शिंदे याने पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल व वसंतराव काळे आय.टी.आय. मधून शिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक झालेले शुभम चोरमले सचिन पाटील काकासो सुरवसे समाधान साठे यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.