1) आंबे, सरकोली,ओझेवाडी,रांजणी परिसरातील बिबट्या पिंजरा लावून जेरबंद करून त्याच्या अधिवासात सोडणेबाबत...
2) बिबट्या च्या हल्ल्यात ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत त्यांना शासकीय नुकसान भरपाई मिळावी.
3) ज्या भागात बिबट्याचा वावर आहे त्या गावातील शेती पंपाचा वीज पुरवठा दिवसा सूरू करावा.
4) शेतातून शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्या मध्ये घबराट निर्माण झाली आहे.
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्याच्या पूर्व भागातील सरकोली आंबे ओझेवाडी इत्यादी गावांमध्ये बिबट्याचा वावर सुरू आहे गेल्या पंधरा दिवसापासून या बिबट्याने सरकोली ओझेवाडी आंबे भागातील शेतकऱ्याचे पाळीव प्राणी जनावरे शेळ्या मेंढ्या व पाळीव कुत्र्यावर हल्ला करून हस्त करून टाकले आहेत.
एकूणच सर्व गावांमध्ये बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे मुश्किल झाले आहे शेतात काम करणारे मजूर दहशतीखाली आहेत शेतीपंपाचा वीज पुरवठा रात्रीच्या वेळी असतो त्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जाऊ शकत नाही अनेक शेतकरी शेतामध्ये राहतात त्यांची मुलं शेतातून गावाकडे शाळेसाठी ये जा करत असतात त्यांच्यामध्येही मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे.
त्यामुळे वरील मागण्याप्रमाणे सदर बिबट्याला पकडून मोठ्या जंगलामध्ये त्याच्या अधिवासामध्ये सोडण्यात यावे अन्यथा दुर्लक्ष झाल्यास एखाद्या शेतकऱ्यावर लहान मुलावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही शेतकऱ्याची जी जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली आहेत त्याचेही पंचनामे करून शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळावी व शेतीसाठी जोपर्यंत बिबट्या जेरबंद होणार नाही तोपर्यंत दिवसा देण्यात यावा या मागण्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आपली प्रशासन व सरकार जबाबदार असे ल याची नोंद घ्यावी.