भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक भगवानराव चौगुले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
पालवी येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप,विद्यार्थ्यांना वह्या वाटप,आयुष्यमान कार्ड लाभार्थ्यांना कार्ड वाटप असे उपक्रम राबविण्यात आले होते.
यावेळी पांडुरंग परिवाराचे युवक नेते प्रणव परिचारक, पांडुरंग चे संचालक तानाजी वाघमोडे,बाळासाहेब यलमर,हरिभाऊ शिंदे,सांगोला तालुका युवक नेते सागर पाटील,युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी बागल,शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी बाबर,दिपक गवळी,सुनील पाटील,सरपंच राजकुमार पाटील,धैर्यसिह निंबाळकर, डॉ.नंदकुमार जगताप,अर्जुन लिंगे,विठ्ठल चौगुले,नितीन शिंदे,सचिन कुचेकर,नाथाजी गवळी,स्वप्नील दानोले,कुंडलिक सातपुते, लुकमान इनामदार,सचिन भोसले,तमीम इनामदार,निहाल शेख,भोजलींग बाबर,नागेश पाटील सागर चौगुले हरिदास चौगुले बापू बुरांडे पप्पू क्षीरसागर महादेव चौगुले,अर्जुन चौगुले, सुहास सराटे,राज चौगुले आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंगेश शिंदे व सौरभ तारळकर यांचा ही वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी प्रणव परिचारक म्हणाले की, भगवानराव यांनी मोठया मालकांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. त्यामुळे एकच पार्टी परिचारक पार्टी म्हणून काम केले आहे. त्यामुळे मानाची पदे त्यांना मिळाली आहेत.यापुढे ही अधिक चांगले काम केले जावे व वाढदिवसानिमित्त चौगुले यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजित जाधव यांनी केले तर आभार भगवानराव चौगुले यांनी मानले.या कार्यक्रमाचे आयोजन शिवभक्त प्रतिष्ठान,पांडुरंग कारखाना कर्मचारी व भगवानराव चौगुले स्नेह परिवार यांनी केले होते.