पंढरपूर प्रतिनिधी
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित, कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शेळवे,पंढरपूर येथे मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन व इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने व आझादी का अमरीत काल च्या निमित्ताने दि. २५/८/२०२३ रोजी विद्यार्थ्यांसाठी पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धे मध्ये सुमारे ९२ विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपली कला पोस्टर च्या माध्यमातून प्रकट केली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील यांनी दिली. अश्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो असे सांगून त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
या स्पर्धेतून देशा ची झालेली प्रगती विद्यार्थ्यांनी पोस्टर च्या माध्यमातून रेखाटली होती.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
यावेळी डिग्री विभागातून साक्षी भिंगे,अक्षदा हलकुडे रविकिरण लोहार, विनायक पाटील, डिप्लोमा विभागातून तनिष्का व्यवहारे, सानिका कांबळे तर कर्मयोगी ज्युनिअर कॉलेज मधून अंकित तिवारी , सोहम शिंदे या वेजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. मेकॅनिकल विभागाचे प्रा. सचिन शिंदे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य पताळे व वैभव कजजेवाड या विद्यार्थ्यांनी केले.यावेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने व इतर सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.