बारामती प्रतिनिधी
दिनांक 2 /9 /2023 रोजी श्री क्षेत्र कनेरी येथे हनुमंत रायाच्या यात्रेनिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD मंगेश चिवटे मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख राम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरील महा आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये जवळजवळ 1870 रुग्णांची विविध प्रकारच्या आजारावरती मोफत तपासणी व औषध वाटप करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख राम राऊत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महापुरुषांना पुष्पहार घालून शिबिराला सुरुवात केली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे संपर्कप्रमुख जितेंद्र सातव ,संभाजी नगरचे शिवसेना. समन्वयक हेमंत पाटील पुणेचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख अजय सपकाळ पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र होले पुणे जिल्हा उपप्रमुख प्रशांत दादा डाबी ,तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष व जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य पांडुरंग मामा कचरे, माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट नाना धावडे ,पत्रकार संघाचे अध्यक्ष तैन्नूर भाई शेख यशवंत सेना ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलणकर कनेरी गावच्या सरपंच शेलार ताई ग्रामसेवक प्रमोद पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये सोमेश्वर गावचे डॉक्टर विद्याधर भिलारे, एमडी मेडिसिन डॉक्टर शुभम शहा एम एस आर्थो डॉक्टर शिंगटे , तज्ञ डॉक्टर स्वप्निल खोमणे एमडी मेडिसिन तज्ञ डॉक्टर कल्याण नाळे एमडी मेडिसिन , नेत्र तज्ञ डॉक्टर अतुल वाळुंजकर , सिल्वर जुबली चे वैद्यकीय अध्यक्ष डॉक्टर महेश जगताप ,आरोग्य विभागाचे डॉक्टर मनोज खोमणे व महिला हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर भोई महिला मेडिकल चे डॉक्टर बोबडे तज्ञ डॉक्टर अमित गाढवे यांनी आलेल्या रुग्णांवरती मोफत तपासणी व औषध वाटप केले.
या शिबिरामध्ये गुडघ्याचे मणक्याचे हाडांचे हृदयाचे किडनीचे मधुमेहाची मोफत तपासणी व मोफत इसीजी कार्यक्रम सर्व आलेल्या रुग्णांची मोफत तपासणी व मोफत औषध वाटप करण्यात आले त्यामध्ये डोळ्यांची मोफत तपासणी करून अल्प दरात चष्मे वाटप केले. यामध्ये वरील रुग्णांना लागणारे औषधे मेडिकल सेलचे चोपडे, संतोष गोलांडे यांनी व महिला हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर भोई यांनी औषध पुरवठा केली काही पेशंट वरती गंभीर आजारावरती मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
या शिबिरामध्ये संपूर्ण मिळून दिवसभरात1870 रुग्णांना वरील डॉक्टरांनी विविध प्रकारच्या आजारावरती मोफत तपासणी करून मोफत औषध वाटप केले याचे सर्व नियोजन बारामती तालुका शिवसेना उपजिल्हाप्रमुख व नेहमी सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कामकाज केलेले .
आजपर्यंत 101 रुग्णांना बारामती शिवसेना वैद्यकीय टीमच्या साह्याने सामाजिक कार्यातून व मुख्यमंत्री सहायता निधीतून गोरखरी रुग्णांना मदत केलेले लिमटेक गावचे सुपुत्र सतीश गावडे यांचे सहकारी तालुका समन्वयक मंगेश खताळ मेडिकल सेलचे शिवसेना समन्वयक संतोष गोलांडे शिवसेना मीडिया पत्रकार श्रीकृष्ण मूर्ती जगताप ,गाढवे सर ,श्रेयश भोसले व पुणे जिल्हा उप समन्वयक नागेश जाधव व तालुका उप समन्वयक आढागळे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षेचे महिला आघाडीच्या सुनिता डोंबाळे ,काळे ,जगताप व कल्पना जाधव व विद्याराजे गायकवाड हे वरील महाआरोग्य शिबिर यशस्वी अतिशय उत्साह मध्ये पार पडले.