सोलापूर प्रतिनिधी
वडोदरा (गुजरात) येथील सुखधाम आश्रमामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील श्री गुरु बम्मलिंगेश्वर बृहन्मठाचे मठाधिपती श्री ष.ब्र. श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
ऑल इंडिया चंदन असोसिएशनचे अध्यक्ष नितीनभाई परेल, राष्ट्रसंत ज्योतीरनाथ महाराज, सोलापूरचे राजेश बलुरगी, मल्लिकार्जुन काबणे आदी उपस्थित होते.