अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील श्री गुरु बमलिंगेश्र्वर कल्याण केंद्र संचलित श्रीमती सीतामाता ज. शेळके प्रशालेत ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगन्नाथ गंगोंडा सर होते.
प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य सिद्धाराम शिवमूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य सिध्देश्वर गंगोंडा यांच्या हस्ते ध्वजस्तंभ पूजन तर मल्लिनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य सोमशेखर हिरेमठ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत खिलारी,शरणप्पा प्रचंडे,शिवपुत्र धनशेट्टी,श्रीमंत धनशेट्टी,गुराप्पा दरगोंडा, श्रीशैल गंगोंडा,बसवराज वाडेद,दर्शन प्रचंडे ,शिवनिंगप्पा प्रचंडे, गजानन प्रचंडे,जगदीश प्रचंडे,रेवणसिद्ध प्रचंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांची भाषणे व समुहनृत्य झाला.आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या ३२ विद्यार्थ्यांना तसेच दोन एन. एम एम. एस.परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या दोन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्रशालेचे मुख्याध्यापिका ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले