सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर भारत स्काऊट गाईड शहर-जिल्हा कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७७ वा स्वातंत्र्य दिन पुणे विभागीय परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी सामुहिक राष्ट्रगीत,राज्यगीतानंतर जिल्हा संघटक स्काऊट श्रीधर मोरे यांनी पंचप्रण अंतर्गत सामुहिकरित्या शपथ दिली.
यावेळी माजी शिक्षणाधिकारी विद्याधर जगताप शिक्षणविस्तार अधिकारी स्वाती स्वामी, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी अशोक भांजे, शिक्षण विस्तार अधिकारी गोदावरी राठोड , राऊत,जिल्हा संघटक गाईड अनुसया सिरसाठ ,खुर्शीद शेख, रशीद पठाण, आशा भोसले, व कार्यालयीन कर्मचारी विश्वास लिंगराज, रिजवाना पठाण, बंडु बंडगर तसेच रोव्हर कुशल घागरे, उजेफ बागवान, शशिकांत स्वामी आदी उपस्थित होते.