सोलापूर प्रतिनिधी
श्रमजीवी नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक शाळा, इंग्लिश मिडीयम स्कूल, माध्यमिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य रविशंकर कुंभार होते. व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर, माजी प्राचार्य विजयकुमार हुल्ले, माजी विद्यार्थी इंडियन ऑइलचे अधिकारी सिद्धेश्वर धुमशेट्टी, पालक-शिक्षक संघटनेचे उपाध्यक्षा मनीषा हबीब, सहसचिव उमेश मायकुंटे, लक्ष्मण दुधभाते,पूनम काशीद, सतीश इंजामुरे,स्नेहा कुणी, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार,पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी उपस्थित होते. प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजनानंतर माजी प्राचार्य विजयकुमार हुल्ले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
याप्रसंगी इयत्ता दहावी, बारावी, आय.टी.एस.व संगीत परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.बालरोग तज्ञ डॉ.डी.पी नकाते यांच्यातर्फे कोमल कुंभार,धानेश्वरी आक्का , निकिता अंजनाळकर या विद्यार्थ्यांनीना 'सौ.जनाई मेमोरियल पुरस्कार" प्रदान करण्यात आला.माजी प्राचार्य विजयकुमार हुल्ले यांच्यातर्फे कोमल कुंभार, सरस्वती भोरगुंडे, स्वामिनी वग्गा,राजेश्वरी बिंगी, आदित्य बिराजदार,श्राव्या नडगेरी या विद्यार्थ्यांना 'शिवकला पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. शिवानंद पुजारी यांच्यातर्फे कोमल कुंभार या विद्यार्थीनीला 'श्री महासिद्ध विद्या प्रतिष्ठान पुरस्कार' देऊन सत्कार करण्यात आला. संगीत परीक्षेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या ललिता रॅका,वैष्णवी घंटे,रक्षिता सुकनपल्ली,धानेश्वरी अचलेरे, प्रचिता श्रावण,साक्षी कुरापाटी, अथर्व कोल्हापुरे,प्रतिभा पाटील लहरिका गोने,पूर्वा रेके,अंश चव्हाण,गणेश चपळगाव,प्रथमेश श्रावण या विद्यार्थ्यांना प्रमाणात व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर आकाश कस्तुरे, सार्थक चिंचोळे, बालाजी जिल्ला, श्रीनिधी रेळेकर,मोहित सिरसुला, रक्षिता भिमानपल्ली, प्रांजली बनसोडे,अवनी अलदी,श्वेता पिडगुंडे, रामचंद्र बुरा, धानेश्वरी अचलैरे, इरेश अक्का, साक्षी कोंतम, आदर्श विठ्ठलकर, प्रतीक्षा हंचाटे, भाग्यश्री नागेल्ली,मयुरी पोषम,अंकिता कस्तुरी, परवीन नदाफ या विद्यार्थ्यांची भाषणे झाली.प्रमुख पाहुणे रेवणसिद्ध रोडगीकर यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगितले . सूत्रसंचालन भारती पाटील यांनी केले.