पंढरपूर प्रतिनिधी
आपला भारत देश 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दीन साजरा करत असतानाच आनंद द्विगुणित करणारा एक आगळा वेगळा विवाह सोहळा कृष्णा मंगल कार्यालय वाखरी तालुका पंढरपूर येथे संपन्न झाला.
भंडीशेगाव येथील दिपक गाजरे हा पंढरपूर अंध शाळेचा माजी दिव्यांग विद्यार्थी व काजल या डोळस मुलीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. दिपक हा सद्या पुणे येथे युनियन बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. व काजल इंग्लिश स्कूलमध्ये बारावी पर्यंत शिक्षण घेतलेले आहे.
याप्रसंगी शहीद मेजर कुणाल गोसावी अंध शाळेच्या माजी मुख्याध्यापक शोभा भारत माळवे यांना मुलगी नसल्याने आपला विद्यार्थी दिपक व काजल यांना लेक जावई मानून त्यांनी साडी ,चोळी, कपडे आणि अधिक वाणाचे ताट लग्न मंडपातच देऊ केले.
यावेळी शोभा माळवे म्हणाल्या की ,मला लेक नाही आणि तीन वर्षानंतर अधिक महिना येत असल्याने मी हा योग साधून मी लग्नकार्यतच अधिक वाण दिला आहे. त्यामुळे या अधिक मासाचे खरे पुण्य प्राप्त झाल्याचा आनंद झाला आहे.
हे दृश्य पाहून वर्हाडी मंडळींनी कौतुकाचा वर्षाव केला. सदर प्रसंगी भडीशेगांव व परिसरातील प्रतिष्ठित मंडळीं, दिपकचे दिव्यांग मित्र व अंध शाळेचे काळजी वाहक अनिल कुंभार हजर होते. सर्वांनी या दिव्यांग मुलाच्या विवाह प्रसंगी उपस्थित राहून शुभाशीर्वाद दिले.