चिंचणी प्रतिनिधी
स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या चिंचणी शाळेत पारंपरिक पद्धतीने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
केंद्र शासनाच्या "मेरी मिट्टी मेरा देश" या उपक्रमासह विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी,नागरिकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य,वृक्षारोपण,प्रदूषण ई.विषयावर आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. ज्ञानेश्वर सूर्यकांत जाधव इन्चार्ज नवी मुंबई महनगरपालिक शाळा,घणसोली व शिष्यवृत्ती तज्ञ मार्गदर्शक यांची उपस्थिती लाभली.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळा,शिक्षक आणि पालक यांच्यात समन्वय असेल तर प्रत्येक विद्यार्थी प्रगत होऊ शकतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे चिंचणी शाळा. आपण आपले गाव एकजुटीने विकास करून स्वयंपूर्ण बनवले तरीही ती आपली देश सेवाच आहे असे संबोधित केले.
श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष मोहन अनपट यांनी आपल्या भाषणातून चिंचणी गाव हे गावकऱ्यांच्या एकजुटी मधून अगदी पुनर्वसित गाव ते झाडांचे गाव, डिजिटल इंडिया चे विकसित ,स्वयंपूर्ण गाव आणि गावाला साजेशीच विकसित डिजिटल शाळा याची यशोगाथा सांगितली.गावातील नागरिकांची एकी असेल तर गाव देशाच्या नकाशातही झळकू शकते हे प्रतीत केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर जाधव यांच्या तर्फे मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना लेखन साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन चे अध्यक्ष शंकर जाधव, माजी अध्यक्ष शरद सावंत,चंद्रकांत पवार,शशिकांत सावंत,ज्ञानेश्वर सावंत,शिवाजी अनपट,मच्छिंद्र कौलगे,तानाजी ननवरे ,सर्व पालक आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जालिंदर गायकवाड सरांनी केले.आभार मुख्याध्यापिका ललिता मोरे यांनी मानले.