भाळवणी प्रतिनिधी
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त जिल्हा परिषद शाळा विकास वाडी येथे धोंडेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच भाऊसाहेब गुरव त्याचबरोबर ग्रामसेवक पाटील साहेब व युवा नेते महादेवजी देठे , विष्णुपंत लोखंडे, शिवाजी नाना लोखंडे आणि सर्व ग्रामपंचायतचे सदस्य यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विकास वाडी या शाळेला वीस ब्रास फेवर ब्लॉक आणि झेरॉक्स विथ प्रिंटर भेट दिला आहे.
त्याचबरोबर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी विद्यार्थ्याला 2 वह्या अशा पद्धतीने लेखन साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संघटनेचे कार्यकर्ते दादासो लोखंडे आणि त्यांचे सहकारी यांचेकडून मिळाले. त्याचबरोबर श्रेया टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मालक सागर लोखंडे यांच्याकडूनही शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी 1 वही मिळाली आहे त्याचबरोबर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व ग्रामस्थांकडून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खाऊ देण्यात आलेला आहे अशा सर्व दात्यांचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम सांगळे यांनी शाळेच्या वतीने आभार मानले.
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन लोखंडे उपाध्यक्ष शहाजी देठे व सर्व सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर अंगणवाडीचे सेविका व मदतनीस सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.