पंढरपूर प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी एनसीसी कॅडेट्सने अतिशय दिमाखदार व नेत्रदीपक संचलन केले व ध्वजाला मानवंदना दिली. ध्वजारोहण प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी स्वतंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांच्या कार्याचे स्मरण केले. त्याचबरोबर स्वतंत्र भारतात झालेल्या शैक्षणिक, वैज्ञानिक व अवकाश क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा उल्लेख, नवीन शैक्षणिक धोरण याविषयी विचार प्राचार्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, सायन्स विभागाचे उपप्राचार्य प्रा. राजेंद्र कवडे, डॉ. बळवंत, जुनियर विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. शिंदे, सुपरवायझर प्रा. युवराज अवताडे, कार्यालयीन प्रमुख प्रभाकर पारधी, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. सचिन येलभर, प्रा. विठ्ठल फुले, एनसीसी प्रमुख लेफ्टनंट डॉ. समाधान माने एनएसएस विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय चौधरी, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश शिंदे, प्रसिद्धी प्रमुख डॉ. दत्तात्रय डांगे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे यांनी केले.